न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १४ डिसें:) :- युनिक व्हिजन स्कूलच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवार (दि.१६) रोजी सकाळी ८ ते १२ यावेळेत काशीधाम मंगल कार्यालय, पवनानगर, चिंचवड येथे ‘’१० वी च्या यशाची गुरुकिल्ली‘’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यात स्वत: डॉ. अ. ल. देशमुख (विज्ञान), मेधा पुराणिक (इंग्रजी), व्ही. एच. गवळे (गणित) या विषयांवर विद्यार्थी व पालकांना शेवटच्या दोन महिन्यात करावयाचा अभ्यास, गुणवत्ता वाढ, परीक्षा कालावधीतील दिनचर्या, अभ्यास व वेळेचे नियोजन कशा पद्धतीने करावे? याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन युनिक व्हिजन स्कूलच्या मुख्याध्यापिका रजनी दुवेदी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे करणार आहेत.












