- क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळेचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाचे नेतृत्व करावे या उद्देशाने क्रीडा,कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे यांनी शहरातील खेळाडूंना उच्चदर्जाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
शहरातील सर्व मनपा व खाजगी शाळांमधील जिल्हास्तर, राज्यस्तर व देशस्तरावरील खेळाडूंची माहिती त्यांच्या क्रीडा प्रकारासह [email protected] आणि [email protected] या ईमेल आयडी वर पाठवावी असे आवाहन प्रा. उत्तम केंदळे यांनी केले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी पानसरे मोबाईल क्र. ९९२२५०१०११ यांच्याशी संपर्क साधावा.