न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. १४ डिसें:) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहरात ‘सी. एम. चषक करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि. १५) रोजी सकाळी १० वाजता सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सी. एम. चषकांतर्गत’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे. तसेच स्वीकृत सदस्य विनोद तापकीर यांच्या पुढाकाराने व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. रहाटणी-काळेवाडीतील तापकीर नगर येथे काका होम्स सोसायटी समोरील मैदानावर दुपारी तीन वाजता ही स्पर्धा होणार आहे.
रविवारी (दि. २३) रोजी स्पर्धेंतर्गत रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छुकांना रविवार (दि. १६) अखेरीस नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, १०० मीटर व ४०० मीटर धावणे, कॅरम, बुध्दीबळ, नृत्य, गायन व कुस्ती स्पर्धा होणार आहेत. स्पर्धांमध्ये विद्यार्थी, खेळाडू आणि शहरवासीयांना सहभागी होता येणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले आहे.
रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेसाठी २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि चषक विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, जलसंवर्धन, स्वच्छ भारत अभियान, आरोग्य हीच संपत्ती-आयुष्यमान भारत योजना, मतदान हा माझा मुलभूत हक्क आहे. व्यक्तिचित्र – अटलजी जीवनपट, निसर्गचित्र, पिंपरी-चिंचवड माझी स्मार्ट सिटी आदी चित्रकला स्पर्धेचे विषय आहेत.
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. कोणतेही शुल्क स्पर्धेसाठी नाही. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आयोजकांच्या पुढील संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा – प्रभाग क्रमांक १६, १७ आणि १८ मधील स्पर्धकांनी बिभिषण चौधरी -९७६३७०१८३३, प्रभाग क्रमांक २२, २७, २८ मधील स्पर्धकांनी संदीप नखाते – ९९७५७५७४७४, प्रभाग क्रमांक २३, २४, २५, २६ मधील स्पर्धकांनी संदीप गाडे – ९८२२३५०१०१, प्रभाग क्रमांक २९, ३१, ३२ मधील स्पर्धकांनी महेश जगताप – ९८२२६६०५०६, प्रभाग क्रमांक ९,१०,२१ राजू सावंत -९८२२७६९८४२, वैशाली खाड्ये- ९८२३२५३५६४, प्रभाग -१४,१५,१९ विठ्ठल भोईर- ९८९०९२४९९९, प्रभाग क्रमांक २०,३० कुणाल लांडगे -९९२२२७०००९, संजय कणसे – ८८८८८६०२९८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.












