- रिक्षा चालकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात शनिवारपासून रिक्षा चालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता पिंपरीतील रिक्षा थांब्यावर रिक्षांचे मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.
वाहतूक विभागाने रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांशी मीटरप्रमाणे प्रवास भाडे आकरण्याच्या विषयावर चर्चा केली. त्यात रिक्षा संघटनादेखील मीटरप्रमाणे प्रवास भाडे आकारण्यासाठी सकारात्मक असल्याचे दिसले.
त्यामुळे यावर पिंपरी – चिंचवड वाहतूक विभागाने तात्काळ निर्णय घेतला आहे. मीटरला नकार देणा-या रिक्षा चालकांच्या तक्रारीसाठी ९५२९६८१०७८ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी दिली.











