- लाखोंचा ऐवज चोरट्यांकडून लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- उघड्या दरवाजातून घरात घुसून भरदिवसा चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज नेल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आकुर्डी प्राधिकरण येथील त्रिमूर्ती हॉल शेजारील बंगल्यात शिरून चोरट्याने ३ लाख ७१ हजार रुपयांची दागिने व रोख रक्कम चोरून नेली. अनिता अरुण लोहकरे (वय ७७, रा. आकुर्डी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १४ नोव्हेंबरला सकाळी दहा ते बारा या वेळेत घडली.
दुसऱ्या घटनेत उघड्या दरवाजावाटे आत येत बेडरूममधील सोफ्यावर ठेवलेल्या पर्समधील रोकड, मोबाईल असा १ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सुवर्णा प्रकाश पाटील (वय ५०, रा. गंगानगर प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
आईसोबत असलेल्या लहानग्याच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने नेली. माऊली मंदिरासमोरील हनुमान मूर्तीजवळील दरवाजासमोर गुरुवारी (दि. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रुपाली मनोज साळवे (वय ३०, रा. इंद्रायणीनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.