न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- दापोडी – सांगवी रस्त्यावरील एसटी वर्कशॉपच्याजवळ उघड्यावरील कचऱ्यात एक कुजलेल्या अवस्थेतील अर्भक सापडले. मंगळवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्कशॉपच्या जवळ एक मृत अर्भक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी अर्भकाचे पाय आणि शरीराचा काही भाग कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मिळालेल्या अवयवांवरून मयत अर्भक हे स्त्री जातीचे आहे की पुरूष जातीचे आहे हे समजू शकले नाही.