- गुणवत्तपूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना गुणवत्तपूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे.
शाकीर जिनेडी हे १९८७ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यांची पोलीस दलात ३३ वर्षे सेवा झाली असून त्यांना आतापर्यंत ४६० बक्षीसे मिळाली आहेत. ते उत्कृष्ट अॅथलेटिक्स खेळाडु असून त्यांना १९८९ मध्ये राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडुचा मान मिळाला होता.
२०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. पोलीस सेवेतील कालावधीमध्ये त्यांनी १०० हून अधिक पिस्तुले जप्त केली आहेत.