- अद्याप एकावरही गुन्हा दाखल नाहीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- बनावट एफडीआरप्रकरणी १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. त्याबाबत पोलिसांना तसे पत्रही दिले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप तक्रारकर्ता म्हणून कोणीही पुढे न आल्याने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
महापालिकेच्या विविध विकासकाच्या निविदा प्रक्रियेत एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) व बँक हमी सादर करणे आवश्यक असते. यात काही जणांनी बनावट एफडीआर सादर करून कंत्राट मिळविले.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या त्यात १८ ठेकेदारांनी असे बोगस एफडीआर सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.