- पै. संतोष नखाते व पै. किशोर नखाते यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
- पै. जयराम नढे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने केले सन्मानित
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, १८ डिसें) :- जालना येथे होणा-या ६२ व्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी काळेवाडी पिंपरी येथे घेण्यात आली. महाराष्ट्र केसरी खुल्या गटात माती विभागातून पै. संतोष सुरेश नखाते याने पै. शाह फैझल कुरेशी याला चितपट केले. तर गादी विभागात पै. किशोर हिरामण नखाते याने पै. प्रमोद मांडेकर याच्यावर विजय मिळवून आपला प्रवेश निश्चित केला. तसेच जानेवारी २०१९ ला मुंबईत होणाऱ्या सीएम चषकसाठी पै. किशोर नखाते व पै. प्रसाद सस्ते यांची निवड झाली.
पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान व निलेशभाऊ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी तापकीर नगर तापकीर मळा काका होम्स तापकीर नगर येथे आयोजित करण्यात आली हेाती.
यावेळी आखाडा पुजन पिंपरी चिंचवड चे युवा उद्योजक व कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे लहान बंधू मा. नगरसेवक शंकर जगताप, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, स्वी. नगरसेवक विनोद तापकीर, ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली कुस्ती उद्योजक शंकर जगताप व पैलवान आप्पासाहेब रेणुसे यांच्या हस्ते लावण्यात आली. समारोप प्रसंगी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पै. जयराम उर्फ जयवंत बाबूराव नढे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार काळेवाडीचे प्रगशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर व प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव, महाराष्ट्र राज्य कूस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, ऑलिंम्पिकवीर पै. मारुती आडकर, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण अध्यक्ष मा सदाशिवराव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, अभिषेक बारणे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संयोजक व ‘ब’ प्रभाग स्विकृत सदस्य देवीदास पाटील, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, सचिव धोंडीबा लांडगे, खजिनदार दिलीप बालवडकर, उपाध्यक्ष महाद्रंग वाघेरे, काळूराम कवितके, आयोजक भारत केसरी पै. विजय गावडे, पंच विजय कुटे, विजय नखाते, मनोज दगडे, बाळासाहेब काळजे, निवृत्ती काळभोर, अतुल नढे, सुत्रसंचालक हंगेश्वर धायगुडे निलेशभाऊ तापकीर मित्र परिवार आदींसह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.
कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणी काळेवाडी परिसरातील नामांकित पैलवानांचा सत्कार ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर, विनोद तापकीर, निलेश तापकीर, नवीन तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजन स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर व निलेश तापकीर यांनी केले तसेच संयोजनात समस्त ग्रामस्थ रहाटणी- काळेवाडी तसेच हनुमंत गावडे, आ. महेश लांडगे, दिलीप बालवडकर, धोंडिबा लांडगे, विजय गावडे, संतोष माचुत्रे, पोपटराव फुगे, विशाल कलाटे, ज्ञानेश्वर कुटे, महाद्रंग वाघेरे, आबा काकडे, राजू जाधव, दिलीप काळे, काळूराम कवितके, सी एम चषकचे संयोजक नगरसेवक अंबरनाथ कांबळे तसेच महेश जगताप, शिवाजी कदम, नवनाथ जांभुळकर, गणेश काशीद आदींनी सहभाग घेतला होता.
विजेत्या मल्लांना स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॅकसुट बक्षिस देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री करंडक स्पर्धेस आमदार लक्ष्मण जगताप व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.












