- शहर मनसेचा दिघी पोलीस ठाण्याला घेराव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ व सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, अचानक सरसकट वीजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा फतवा त्यांनी काढला. त्यामुळे वीज ग्राहकांची फसवणूक झाली. या फसवणूक मंत्र्यांवर तातडीने ४२० फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसेने पोलिसांकडे केली आहे.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली दिघी- वडमुखवाडी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अंकुश तापकीर, उपशहरध्यक्ष राजू सावळे, विशाल मानकरी, सचिव राहुल जाधव, विभागाध्यक्ष दत्ता देवतरसे, संतोष यादव, दिग्विजय गवस, हेमंत तिवारी, प्रतिक शिंदे, सुधीर भालेराव, आकाश मोहिते, अभिजीत शिगंले, मयूर हजारे, रवी जाधव, आबा कापसे, गणेश लोणारी, तुषार बनसोडे, दत्ता धर्म, तानाजी चोरमले, विशाल ओव्हाळ व भोसरी विधानसभेतील प्रभागध्यक्ष व उपविभागध्यक्ष, शाखाध्यक्ष उपस्थित होते.