- सहा गुन्हे केल्याचे तपासात उघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुरुवारी (दि. १४) झालेल्या घरफोडी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सहा गुन्हे केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चोरीच्या पैशातून घेतलेली नवी जावा दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य असा एकूण ६ लाख ८७ हजार ६५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
प्रकाश उर्फ नानाभाऊ शंकर लंके (वय-४४ रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर उर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (वय-३९ रा. मारुंजीरोड, हिंजवडी), ओंकार विभिषण काळे (वय-१८ रा. धानोरी रोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.