- संरक्षण अभियानांतर्गत कॉलेजच्या विभागप्रमुखांची सांगलीतील हुतात्मा कॉलेजला भेट..
- अमोल भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिले संरक्षणाचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या अनुषंगाने साधेपणाने साजरा करण्यात आला.
भाजपच्या महिला पदाधिकारी शितलताई धनंजय वर्णेकर, आयआयबीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, कु. अभिषेक वर्णेकर, डॉ. तेजस्विनी गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महापलिकेचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड, नगरसेविक साधनाताई मळेकर, स्विनलताई म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, आयआयबीएम कॉलेजचे प्रा. आदित्य वर्तक, प्रा. गिरीश काटे, प्रा. सचिन देसाई, प्रा. एकता सिंग, प्रा. डॅनियल, प्रा. मुकुंद होशिंग, प्रा. वेदांत कुलकर्णी, प्रा. सीमा देसाई, सचिन बरबडे, आदिती खानविलकर आदी उपस्थित होते.
शितलताई वर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तर, आभार विभाग प्रमुख डॉ. तेजस्विनी गायकवाड यांनी मानले.
तसेच चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवामधील हुतात्मा किसन अहिरे ज्युनियर कॉलेजला भेट देऊन संरक्षण अभियानात सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हजेरी लावली. यावेळी आयआयबीएमचे प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, प्रशासक संतोष घाडगे उपस्थित होते. प्राचार्य वायदंडे सर व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.
अमोल भागवत यांनी संरक्षण अभियानांतर्गत उपस्थितांना मास्क व सुरक्षा साहित्याचे तसेच विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप केले. हे संरक्षण अभियान डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले, अशी माहिती भागवत यांनी दिली.














