- आजपर्यंत कोरोनाबाधित एक लाख तर कोरोनामुक्त ९६४४४…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २८ जानेवारी) रोजी ११० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपरी ६८ वर्षीय, दापोडी ६८ वर्षीय, नेहरूनगर ७५ वर्षीय वडमुखवाडी ८८ वर्षीय तसेच हद्दीबाहेरील आंबेगाव ८४ वर्षीय, नारायणगाव ७५ वर्षीय पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०००१४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६४४४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८०४ जणांचा मृत्यू झालेला आहे.














