- कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे पदाधिकाऱ्यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- शिवसेना मिशन २०२२ अंतर्गत प्रभागनिहाय बैठका सुरु असून, विधानसभानिहाय मेळाव्याचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेना मिशन २०२२ अंतर्गत पिंपरी विधानसभा मेळावा शनिवार दि. ३०/०१/२०२१ रोजी दु. ३:०० वा स्थळ: कै. मल्हारराव कुटे सभागृह, विठ्ठल मंदीराजवळ, आकुर्डी तर, चिंचवड विधानसभा क्षेत्र मेळावा संध्याकाळी. ५ वा स्थळ: शिव कॉलनी सभागृह, वाकड रोड, थेरगाव येथे संपन्न होणार आहे. या शिवसेना मिशन २०२२ मेळाव्यास शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीस प्रमुख उपस्थिती युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर,शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे, युवासेनेचे जितेंद्र ननावरे, विश्वजीत बारणे, अभिजित गोफण, प्रतीक्षा घुले, शर्वरी जळमकर, आदीप्रमुख पदाधिकारी तसेच शिवसेना उपशहरप्रमुख, संघटक, समन्वयक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थीसेना, शिवसेना अंगिकृत सर्व संघटनांचे पदाधिकारी व सर्व शिवसैनिक बांधव-भगिनींनी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.


















