न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचारी यांनी आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्याची काळजी घेत आनंदाने जगावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
मनपा सेवेतून माहे जानेवारी २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणा-या १६ तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १४ अशा एकूण ३० अधिकारी व कर्मचा-यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या कमल घोलप, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे,सुप्रिया सुरगुडे, अविनाश ढमाले, निलेश घुले, बाळासाहेब साठे, तुषार काळभोर, मिलिंद काटे आदी उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, लेखाधिकारी कल्पना साळवी, उपलेखापाल शेखर म्हस्के, कार्यालयीन अधिक्षक जयश्री भोसले, विद्युलता कदम, नंदकुमार जगताप, मुख्य लिपिक शोभना यादव, राजेंद्र गोरे, जगन्नाथ दातीर, उपशिक्षका ज्योत्स्ना वानखेडे, अलका गवळी, अन्न निरीक्षक रविंद्र नागवेकर, क्रिडा पर्यवेक्षक आशा ढवळे, फायरमन राजेंद्रकुमार गवळी, रखवालदार शिवाजी यमगर, सफाई कामगार ताराबाई लोंढे यांचा समावेश आहे. तर स्वेच्छानिवृत्त झालेल्यांमध्ये सह शहर अभियंता प्रवीण तुपे, लेखापाल मादास पर्वतराव, ए.एन.एम. संदेशा साळवी, सायराबानु सय्यद, मुकादम प्रसाद निमल, सफाई कामगार शोभा गायकवाड, राधाबाई शिंदे, अरुणा परदेशी, रोशन कांबळे, शोभा कांबळे, कांताबाई साळवे, जयश्री आखाडे, सफाई सेवक प्रेमचंद चनाल, गटरकुली राजेंद्र मते आदींचा समावेश आहे.


















