- कोरोना योद्ध्यांनाच सरकारचे पहिले प्राधान्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- “आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. आपल्याकडे लसींची कमतरता निर्माण होणार नाही यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
त्यामुळे सामान्य नागरिकांना पुढील चार-पाच महिन्यांमध्ये लस उपलब्ध करून देण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.
पुण्यात एका पुरस्कार कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, “अत्यावश्यक सेवांमधील कर्मचा-यांनी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थाकडे लसीकरणासाठी नोंदणी करावी. लसीकरणाबाबत आत्मविश्वास वाढत आहे. ही चांगली सूट आहे. सांगितल्याप्रमाणे ३० कोटी लोकांना त्वरेने लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल.
















