काळेवाडीतील अनमोल बिअर बार रेस्टॉरंटमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- बिलाच्या कारणावरून हॉटेल मालक आणि तीन वेटरने मिळून एका ग्राहकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी हॉटेल मालक आणि तीन कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २८) रात्री बारा वाजता काळेवाडी येथील अनमोल बिअर बार रेस्टॉरंट येथे घडली.
सुदर्शन बबन लोखंडे (३८, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनमोल हॉटेलचा मालक शेट्टी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि तीन वेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी लोखंडे त्यांच्या मित्रांसोबत काळेवाडी येथील जनमोल हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी लोखंडे आणि हॉटेलचे मालक यांच्यात बिलावरून वाद झाला. आरोपींनी लोखंडे यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. बिअरची बाटली लोखंडे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, एक कामगार चाकू घेऊन लोखंडे यांच्या अंगावर मारण्यासाठी आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
















