- त्यांच्या बदलीची पालिका आवारात जोरदार चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- कोरोना काळात सलग दहा महिने काम केल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे आठवड्याच्या सुटीवर गेले आहेत. मात्र, महापालिकेत त्यांच्या बदलीची चर्चा आहे. ओडिशा केडरचे राजेश पाटील यांच्या नावासह चार जणांच्या नावाची चर्चा आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा साडेतीन वर्षांचा कालखंड पूर्ण झाला आहे. मात्र, कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्डीकर यांची बदली केली नव्हती. कोरोना काळात पुण्याचे आयुक्त बदलले असतानाही पिंपरीचे आयुक्त बदलले नव्हते. कोरोना काळात संवदेशीलपणे काम केल्याने पवार यांनी त्यांना मुदतवाढ दिली होती.
कोरोना काळखंडात सलग दहा महिने हर्डीकर यांनी काम केले. त्यानंतर पहिल्यांदाच आठवड्याच्या सुटीवर गेले आहेत. दिनांक २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत रजेवर आहेत. आयुक्तांच्या सुटीमुळे त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या जागी ओडिशा केडरचे राजेश पाटील, म्हाडाचे प्रमुख योगेश म्हसे, रुबेल आगरवाल, सुहास दिवसे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.


















