- ग्राहकांसाठी महत्वाचा बदल आजपासून होणार लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाचा बदल आजपासून होणार आहे. पंजाब नॅशनल बँकने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेत बँकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
आजपासून पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्समधून पैसे काढता येणार नाहीत. ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्स या कार्डवरील डेटा मॅग्नेटीक स्ट्रीपच्या मदतीने वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या एटीएम मशीनमध्ये व्यवहार सुरु असतानाच कार्ड आतमध्ये न राहता डेटा वाचून बाहेर येत अशा मशीनमधून आजपासून पीएनबीच्या ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत.


















