- बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते १,११,१११ रुपयांचा धनादेश सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी काळेवाडी-रहाटणीतील सामाजिक कार्यकर्ते हरेश तापकीर यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते हा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मजागरण हेमंत हरहरे व विभाग संघचालक आप्पासाहेब गवारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजयुमोचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह चंदूभाऊ पाठक, विभाग धर्मजागरण संयोजक माधव खोत, चिंचवड अभियान प्रमुख सचिन बालवडे, राजवीर तापकीर, बाळासाहेब सुबंध आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते हरेश तापकीर म्हणाले की, अयोध्या येथे उभारण्यात येणारे श्रीराम मंदिर हे देशातील करोडो जनतेचे स्वप्न आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार होणार आहे. त्यासाठी देशभरातून देणग्यांचा ओघ येत आहे. गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद न करता प्रत्येक जण आपापल्या परीने या पवित्र आणि ऐतिहासिक कार्यासाठी हातभार लावण्याचे काम करीत आहे.
या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मलाही निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. शहरातील श्रीराम भक्तांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हरेश तापकीर यांनी यावेळी केले.















