- पीडित १२ नायजेरियन तरुणींची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपळे गुरव येथील उच्चभू सोसायटीत सुरू असलेल्या नायजेरियन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे रॅकेट नायजेरियन महिलांकडून चालविण्यात येत होते. त्यातील चार महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर पीडित १२ नायजेरियन तरुणींची सुटका केली.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपळे गुरव येथे मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे एका इमारतीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन पथके तयार करून १५ ते २० दिवस माहिती घेऊन माग काढला. तसेच हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशन आणि पोलिसांनी सापळा लावून चार बनावट गि-हाईक पाठविले. इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तेथे १६ नायजेरियन महिला मिळून आल्या. त्यातील चार महिला अन्य १२ महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होत्या. त्या चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १२ महिलांची वैद्यकीय तपासणी करून रेस्क्यू फाउंडेशन, हडपसर येथे दाखल करण्यात आले आहे.
नायजेरियन महिला इतर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडून तपासले जात आहेत. पोलिसांनी या कारवाईत ४० हजार २७० रुपये रोख रक्कम, बनावट गिन्हाईकांकडून सहा हजार रोख रक्क, ३६ हजार ५०० रुपयांचे सात फोन, २० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ८२ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.