न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. डिसें.) :- आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवार (दि. १७) रोजी आयुक्त दालनात आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांची बैठक पार पडली. बैठकीस महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सर्व शाखा प्रमुख, कार्यकारी अभियंता व प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीस महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सर्व शाखा प्रमुख, कार्यकारी अभियंता व प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.
शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त व प्रशासनास फैलावर घेतले. जगताप म्हणाले की, नदीच्या कडेने राडारोडा टाकणेत येतो. त्याची जबाबदारी कोणाची? मोकाट जनावरे, कुत्रे व डुकरे यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांस सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत कारवाई करावी. रस्ते व साफसफाई नियमित करण्यात यावी. काम न करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी. शाळा व ओपीडी यांना कलर कोड करावा.
अंपग शाळांना कर माफी दयावी, सार्वजनिक शौचालयांची देखभाल व्यवस्थीत व्हावी. मराठी शाळांना करामध्ये सवलत दयावी. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन, शहरातील वाहतुकी बाबत डावी बाजू मोकळी करणे. प्रत्येक किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूस मुतारी/ शौचालय उभारणे व त्याची देखभाल व्यवस्थीत करणे. शाळांचा दर्जा उंचावणे, अनधिकृत फलक अनाधिकृत बांधकाम, हॉकर्स झोन, भाजी मार्केट सुधारणा, महापालिकेचे दवाखाने व ओपीडी अद्ययावत करणे, आदी विषयाचा आढावा आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण लांडगे यांनी या बैठकीत घेतला.
यावर येत्या आठवडाभरात सर्व अधिका-यांनी कार्यवाही करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बैठकीत सांगितले.












