- राष्ट्रवादीच्या चार सदस्यांपैकी दोन सदस्यांची मुदत संपुष्टात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार सदस्यांपैकी दोन सदस्यांची मुदत पूर्ण झाली आहे. महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यातील महासभेमध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
त्यासाठी पक्षाच्या गटनेत्यांनी महासभेत आपल्या सदस्यांची नावे द्यायची आहे. सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागविले आहेत. स्थायी समितीसाठी इच्छुकांनी अर्ज १५ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विरोधी पक्षनेता कार्यालयात आणून द्यावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले आहे.
















