न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०८ फेब्रुवारी) रोजी ६९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीमधील चऱ्होलीतील ६४ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०१००९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९७३५४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२२ जणांचा मृत्यू झालेला आहे.