- वेश्यांची सुटका तर, बारा जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- वेश्या व्यवसायास प्रवृत्त केलेल्या दोन घटनांमध्ये बारा जणांना पोलिसांनी अटक केली. पिपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काळेवाडी रस्त्यावरील सिटी प्लाझा लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी कारवाई करीत महिलांची सुटका केली.
चिरंजित देवाशिष सरकार (वय २५, रा. सिटी प्लाझा हॉटेल, काळेवाडी), तिलक कर्ण थापा (वय १९), आकाश प्रदीप बिशी (वय २२), प्रवीण जयसिंग गंगावणे (वय ६०, रा. संत तुकारामनगर), अब्दुल हमीद (रा. मोरवाडी चौक) अशी आरोपींची नावे आहेत.
कल्पना लॉजवर कारवाई करीत पोलिसांनी महिलांची सुटका केली. याप्रकरणी बबलू प्रसाद, जयराम अण्णा गोडडा, अजयकुमार श्रीगणेश यादव (वय २५, रा. कल्पना लॉज, पिंपरी), अजितकुमार साव (वय ३५, रा. कल्पना लॉज, पिंपरी), शांता पुजारी ऊर्फ छोटू, दीपक कटारिया (रा. पिंपरी) यांना पोलिसांनी अटक केली.