- ४० अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा..
- मंगळवारीदेखील कारवाईचा आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- प्रभाग तीनमधील वडमुखवाडी व मौजे मोशी (प्रभाग क्र. ३) मध्ये रेड झोनमधील अनधिकृत बांधकामावर, आज सोमवारी (दि ०८) रोजी महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईत अंदाजे ४८०१० चौ. फूट बांधकाम पाडण्यात आली.
या कारवाईत अतिरिक्त आयुक्त – २ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रणाखाली उपअभियंता हेमंत देसाई, सुर्यकांत मोहित, सुधीर मोरे तसेच ५ शिष्ठ अभियंता व एकूण ३५ बीट ऑफीसर तसेच कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी. सी. पी सुधीर हिरेमठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, शिवाजी गवारे, ४ पी.आय. ५ पी.एस.आय व ४२ पोलीस कर्मचारी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी ३ पोकलेन, ५ जेसीबी, २५ मजूर व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी (दि. ०९/२/२०२१) रोजी देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार असुन, बांधकामधारकांना बांधकाम काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे.