न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १८ डिसें.) :- कॉंग्रेस पक्षाच्या आधारस्तंभ व माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने (दि. १३) रोजी पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन, रोझलँड रेसिडेन्सी, रोझ आयकॉन या सहकारी सोसायटींना सेवा-कर्तव्य- त्याग हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले, विवेक तितरमारे, सुधीर लांडगे, जितेंद्र चौधरी, सरिता जामनिक, आबा खराडे, अल्ताफ शेख, कृष्णा लोखंडे, संतोष मस्कर, आनंद दफ तरदार, सिद्धार्थ नाईक, विनोद सुर्वे, प्रवीण ढवळे, जॉन डिसुझा, कल्याणी सुंदर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सोसायटीचे अध्यक्ष व संचालक तसेच रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणाल आयकॉन सोसायटीने सोसायटीतील कचरा व घनकचऱ्याचे विल्हेवाटीसाठीचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. तसेच राष्ट्रपती पदक विजेत्या रोझलँड रेसिडेन्सीमधील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. सर्व धर्म समभाव या उक्तीशी साजेसे काम रोझ आयकॉन सोसायटी करीत असून, स्वधर्माबरोबरच इतर धर्मियांच्या सणवारामध्ये या सोसायटीतील प्रत्येक सदस्य सहभागी होऊन आनंद साजरा करीत असतो.
या तिन्ही सोसायटीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण असो कि स्वच्छतेचा संदेश असो, तसेच बंधुभावाची वागणूक असो सर्व बाबतीत या तिन्ही सहकारी सोसायट्यांचा आदर्श शहरातील इतर सहकारी सोसायटींनी घ्यावा. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे, नवले यांनी सांगितले आहे.












