न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १८ डिसें.) :- चिखली-कुदळवाडी परिसरात अग्निशमन केंद्राचे स्थळ व दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी स्वी नगरसेवक दिनेश यादव यांनी पिं. चिं. मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे
चिखली येथे अग्निशमन केंद्राचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले आहे. चिखलीतील कुदळवाडी परिसरात वारवांर आगीच्या घटना घडत असतात. नवीन उभारण्यात आलेले अग्निशमन केंद्र मध्यवर्ती परिसरात आहे. त्यामुळे मध्यवर्ती परिसराबाहेर आगीच्या घटना घडल्यास अग्निशामक केंद्र नागरिकांच्या सहजपणे लक्षात येत नाही.
आग विझवण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच अग्निशामक वाहने किंवा खाजगी वाहनांना चिखली येथील अग्निशमन केंद्रामध्ये सहजपणे पोहचता यावे, याकरीता चिखली-कुदळवाडी परिसरात जागोजागी स्थळ व दिशादर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत, अशी मागणी स्वी नगरसेवक दिनेश यादव यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे












