न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- सात्तत्याने होत असलेल्या पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस च्या दरवाढी विरोधात व केंद्र सरकारच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने चिंचवड चौकात विश्वासघात आंदोलन करण्यात आले.
या वेळी केंद्रातील भाजपा च्या मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. सबके साथ विश्वासघात ! अब की बार बूरे फसे यार ! झुठे वादे ! झुठी सरकार ! भाजपा सरकार मुर्दाबाद ! अशा घोषणा देण्यात आल्या.
पेट्रोल च्या किमती ने शंभरी गाठल्याने या वेळी उपहासात्मक दर-शतक साजरे करण्यात आले या साठी काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक सेंचुरी सेलिब्रेशन करत केंद्र सरकारचा निषेध केला.
या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा पंद्री, कष्टकरी कामगार परिषदेचे नेते प्रल्हाद कांबळे, बहुजन चळवळीतले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, मीनाताई कांबळे शहर काँग्रेस चे पदाधिकारी संदेश नवले, आबा खराडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस राहूल काळभोर, शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, गणेश शितोळे, हर्षवर्धन पांढारकर, विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, मिंलिद बनसोडे, अलोक लाड, अर्णव कामठे, अमित जगदाळे, तेजस पाटील, प्रविण जाधव, तेजस पवार, आफताब खान, नईम शेख, जाकीर चौधरी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















