- नगरसेविका अनुराधा गोरखेंचा आमदारांच्या वाढदिनी उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरात श्रीमती अनुराधा गोरखे यांनी राबविलेल्या मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मा वाटप शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सदाशिव खाडे, नगरसेवक तुषार हिंगे, सरचिटणीस राजू दुर्गे, भाजपा शहर उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी YCM हॉस्पिटल व Dr Dy Patil hospital च्या डॉक्टर्स टीम ने मदत केली. शिबिरात एकूण ६२७ जणांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी विजय शीनकर, दीपाली करंजकर, रुपेश सुपे, वैदही जंजाळे, नंदा करे, अजित भालेराव, मोनाली यादव, संतोष रणसिंग, नेताजी शिंदे, यशवंत दनाने, मनोज कसबे, सोनटक्के, धनंजय जगताप, राकेश ठाकूर, जयश्री वाघमारे, धरम वाघमारे, बाबा इटकर, मिलिंद कांबळे, शेखर साळवे, सुनील शेलार, अविनाश वेताले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


















