- प्राथमिक आरोग्य केंद्राचे होणार आरोग्यवर्धिनी केंद्रांत रूपांतर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- सार्वजनिक आरोग्यसेवा वितरणात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी महापालिका सोशल इम्पॅक्ट बाँड उभारणार आहे. महापालिका आणि यूएनडीपीने भारताच्या पहिल्या सोशल इम्पॅक्ट बाँडची आखणी व अंमलबजावणी यावर चर्चा सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.
यूएनडीपी ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत बहुस्तरीय विकास करणारी अग्रणी संस्था असून, आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण हे यांचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे. पिंपरी महापालिका भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे. काही रुग्णालयांना असंसर्गजन्य रोगांकरिता विशिष्ट उपचार केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखत आहे.