- बोपखेलमधील प्रकार; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- फिर्यादी शशांक मंडल हे माजी सैनिक आहेत. त्यांना आरोपींनी नोकरीचे अमिश दाखवले. नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पेटीएम द्वारे आठ लाख ४३ हजार ७५० रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हा प्रकार ११ जुलै ते एक ऑगस्ट २०२० या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडला.
शशांक शेखर मंडल (वय ५२, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ९३१९३२३८२२ मोबाईल धारक अदिती शर्मा, ९७१७७६१९०१, मोबाईल धारक शीतल, ९७१७२२९६६७ मोबाईल धारक सारिका आणि ९९९६२०९५२९ मोबाईल धारक राजीव गुप्ता अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.