- वायसीएम, पालिका व सरकारी रुग्णालयात विनाशुल्क; स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. मार्च. २०२१) :- शहरातील खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी २००१ एमएलच्या अफेरेसिस प्लाझ्मा बॅग आता सहा हजार रुपयांना मिळणार आहे.
वायसीएम रुग्णालय, महापालिका हॉस्पिटल, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रक्त व रक्तघटक (प्लाझ्मा) मोफत मिळणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
प्लाझ्माची एक बॅग तयार करण्यासाठी ११ हजार १५० रुपये खर्च येतो. परंतु, महापालिका सहा हजार रुपयात बॅग उपलब्ध करून देणार आहे. अफेरेसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्लाझ्माच्या २०० एमएलच्या एका बॅगसाठी खासगी, विश्वस्त रक्तपेढ्यांना, रुग्णालयांना रुग्णाकडून पाच हजार ५०० रुपये प्रतिबॅग इतके कमाल शुल्क ( सर्व करांसहित ) आकारण्यास राज्य सरकारने २४ सप्टेंबर २०२० ला मान्यता दिली आहे.
.