- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- गांजा विकणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी सहल केंद्राजवळून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २३ हजार ५० रुपये किमतीचा दोन किलो ३०२ ग्रॅम गांजा जप्त केला.
उत्तरेश्वर ऊर्फ बॉक्सर दगडू कांबळे (वय ५८, रा. भोसरी, मूळ रा. डिकसळ, ता.कळंब, जि. उस्मानाबाद), शंकर ज्ञानदेव आसोले (वय २४, रा. भोसरी, मूळ रा. हिवरा आश्रम, ता. मेहकर, जि. बुलढाणा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांनी फिर्याद दिली आहे.
भोसरी सहल केंद्राच्या बाजूला दोघे जण बेकायदेशीरपणे गांजा विकत असल्याची माहिती सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता दोघे जण बेकायदेशीपणे गांजा विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो ३०२ ग्रॅम वजनाचा २३ हजार ५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
पिंपरी परिसरात मासुळकर कॉलनी येथे भाजी मंडईत अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आहे. परतीक कृष्णवीर सिंग (वय २३, रा. रहाटणी), विवेन विन्सेंट अल्बर्ट (वय २२, रा. काळेवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

















