न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- दिघी येथील विनायक पंढरीनाथ भोंगाळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पिंपरी चिंचवड, पुणे अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी भोंगाळे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
आपल्या निवडीबद्दल विनायक भोंगाळे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजकीय समन्वयक डॉ. खुशालचंद बोपचे, महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष सुधाकर जाधवर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश भावर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
तसेच विविध समस्या, अडीअडचणी, प्रश्नांवर समाजाला एकत्र आणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. भोंगाळे यांच्या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
















