- वाटपावरून झाला वाद; पोलिसांनी खजिना केला जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- चिखलीत बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत असताना खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी त्यांनी एकाला दाखवली. दुसऱ्या दिवशी मातीचा ढीग उकरून कांस्य धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी एकाच्या घरी आणून ठेवली. सापडलेली नाणी कोणी किती घ्यायची यावरून दोघात वाद झाला. सुमारे तीन महिन्यांपासून वाटपावरून वाद सुरू होता.
सोन्याच्या सध्याच्या बाजारभावाने एका नाण्याची किंमत ७० हजारांपर्यंत आहे. मात्र पुरातन असल्याने नाणी मौल्यवान असल्याचे सांगितले जाते आहे.
इतिहास कालीन ही नाणी १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याची पुरातत्त्व विभागाकडून माहिती मिळाली आहे. ५२६ ग्रमच्या कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्यामध्ये २३५७ ग्रॅम वजनाची २१६ नाणी जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
सलाम सालार खॉं पठाण (रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी) याने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगली आहेत. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली.