- नगरसेविका माया बारणेंच्या रिक्त जागी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी भाजपचे तुषार हिंगे यांची आज (मंगळवारी) महासभेत निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) आयोजित करण्यात आली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.
शिक्षण समितीची मुदत जुलै महिन्यात संपली होती. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नवीन सदस्यांची निवड झाली नव्हती. १३ ऑक्टोबर रोजी शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली.
त्यात भाजपच्या माया बारणे यांचाही समावेश होता. मात्र, गेल्या महिन्यात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे समितीतील एक जागा रिक्त होती. त्याजागी भाजपचे तुषार हिंगे यांची निवड करण्यात आली.