- पाच महिलांची सुटका; दोन आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. ९) रोजी दुपारी छापा टाकून पाच महिलांची सुटका करून आरोपींना अटक केली.
स्पा सेंटरचा चालक व मालक अमोल दत्तात्रय नवले (वय २९, रा. चाकण), तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर आकाश अनिल सोनवणे (वय २४, रा. थेरगाव, मूळ रा. औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















