- शहरात आज १२४८ जणांना बाधा; पाच रुग्णांचा मृत्यू तर, ६१५ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १७ मार्च) रोजी १२४८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – पिंपरी (५८ वर्षे) ०२ स्त्री – पिंपळे निलख (८० वर्षे), फुगेवाडी (९४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – लोहगाव (३५ वर्षे), भंगारवाडी (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११६८९६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०७०९६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८८८ जणांचा मृत्यू झालेला आहे.
प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – १९७, ब – १६९, क – १६८, ड – १९७, इ – १४२, फ – १२६, ग – १४०, ह – १०९, एकुण – १२४८.