न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २२ डिसें.) :- माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २२ विजयनगर, काळेवाडी येथे शुक्रवार (दि. २१) रोजी सन २०१९ च्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वि. नगरसेवक देविदास पाटील, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका ललिता पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस धर्मा पवार, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील, भाजपा कार्यकर्त आनंदा पाटील, अंबादास पवार, भटू महाले, मिनाक्षी पवार, प्रतिभा ताम्हणकर, सुभेदार बांद्रे, प्रभाकर डेरवणकर व आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
परिसरातील मोरया कॉलनी, सप्तशृंगी कॉलनी, गणेश कॉलनी, शांती कॉलनी, अल्फान्सो शाळा रोड, पवना नगर येथे घरोघरी जाऊन दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.










