न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २२ डिसें.) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कुलमध्ये गुरुवार (दि. १३) रोजी गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत २ ते १५ वयोगटातील विध्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी शाळेचे संस्थापक संदीप काटे म्हणाले की, एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्यसंपर्क सत्राच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला (एम. आर) लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झालेला आहे. गोवरचे दूरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एमआरची लस टोचणे अत्यावश्यक आहे.
शिशुवर्ग व पालकांचा सहभाग लक्षणीय होता. पूर्वप्रथामिक तसेच माध्यमिक अशा एकूण ६२५ विध्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यासाठी शाळेचे संस्थापक संदीप काटे व मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांचे मोलाचे मागर्दर्शन लाभले.










