न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २२ डिसें.) :- गेल्या अनेक दिवसांपासून चिखलीतील कुदळवाडी-पवारवस्ती उड्डाणपूलाखालील अंडरपास बंद करण्याची मागणी होत होती. या रस्त्यालगत व परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकीत असत व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा जाळीत असत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असे.
परिसरातील ही समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांपूर्वी येथील रहिवाशी पै. खंडु पवार व कु. पवार यांनी प्रशासनाकडे या रस्त्यावर गेट बसविण्याची मागणी केली होती. या समस्येची दखल घेत बीआरटीचे अधिकारी सुर्यवंशी यांनी या कामास मंजुरी दिली असून, आज शनिवार (दि. २२) रोजी या रस्त्यास लोखंडी गेट बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, असे स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










