- शहर भाजपचे युवा नेते पांडाभाऊ सानेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- जागतिक जल दिनाचे औचित्य साधून शहर भाजपचे युवा नेते पांडुरंग साने यांच्या पुढाकारातून चिखली, मोरेवस्ती येथील मनपा शाळा क्र. ९२ येथे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. या मोहिमेंतर्गत मोरे वस्ती येथील मनपा शाळा क्र. ९२ येथे लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी तसेच लसीकरणासाठी येणारे नागरिक यांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती.
सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाण्याभावी होणारी गैरसोय पाहून भाजप युवा नेते पांडुरंग साने यांनी जागतिक जल दिनानिमित्त या ठिकाणी पाणपोई सुरु केली. मान्यवरांच्या उपस्थितीत या पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. तसेच परिसरात विविध ठिकाणी आणखी पाणपोई सुरु करणार असल्याचे साने यांनी सांगितले.
















