- पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- मोरवाडी चौकातून पिंपरीगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे, हातगाड्या, टपऱ्या काढण्याची कारवाई महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.
या कारवाईत चार हातगाड्या, आठ टपऱ्या, तीन काऊंटर, बांबूचे तात्पुरते उभारलेले १५ शेड काढून टाकण्यात आले. एक जेसीबी, एक क्रेन, चार डंपर, अतिक्रमणचे बारा पोलिस, पंधरा अतिक्रमण कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी अभिजित हराळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निरीक्षक नाना देवचक्के, क प्रभाग अतिक्रमण निरीक्षक लक्ष्मण काळे, ड प्रभाग कार्यालय अधीक्षक अरुण सोनकुसरे यांच्या नेतृत्वाखाली ह, क आणि ड अशा तीन अतिक्रमणविरोधी पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली.
















