- भोसरीतील प्रकार; पैशांसाठी महिलेचा छळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावून तीन वेळा तोंडी तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडोबा माळ, भोसरी येथे हा प्रकार उघडकीस आला.
आझम पापाभाई पटेल (वय ३५), सासूबानू पापाभाई पटेल (वय ६०), दीर फरीयाज पापाभाई पटेल (वय ३२), नणद मुमताज पापाभाई पटेल (वय ३४. सर्व रा. खंडोबा माळ, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचे पटेल याच्याशी २०१७ मध्ये ९ एप्रिल रोजी लग्न झाले. त्यानंतर माहेरून पाच लाख रुपये आण, आम्हाला तुझ्या पगाराचे पैसे दे, असे म्हणून चारित्र्यावर संशय घेतला. पटेल याने तीन वेळा तलाक असे उच्चारून फिर्यादीला तोंडी तलाक दिला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक रवी भवारी तपास करीत आहेत.
















