- पीएमपीएमएल प्रशासनाकडून पालिकेकडे पैशांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२१) :- शहरातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग, कर्णबधीर आणि १०० टक्के अंध नागरिकांना बस प्रवासासाठी मोफत पास देण्यात येतो. गेल्या वर्षात शहरातील २४०४ दिव्यांगांनी मोफत बस प्रवास केला. त्यासाठी पीएमपीला २ कोटी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. जानेवारी २०११ रोजीच्या निर्णयानुसार, शहरातील अंध, नि:समर्थ, कर्णबधीर, मतिमंद व्यक्तींसाठी विकासाच्या योजना सुरू करण्यास मान्यता दिली. त्याच अनुषंगाने हद्दीतील विद्याथ्यांबरोबरच शहरातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या शहरातील सर्व ठिकाणच्या दिव्यांग, कर्णबधीर आणि १०० टक्के ७१ हजार अंध नागरिकांना पीएमपीएमएल बस पीएमपी प्रवासासाठी मोफत पास देण्यास मान्यता दिली आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून २५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या पत्रानुसार, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता २४०४ पास वितरीत करण्यात आल्याचे कळविले आहे. या पाससाठी खर्च झालेली २ कोटी २० लाख ७१ हजार रुपये इतकी रक्कम मिळण्याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाने महापालिकेला विनंती केली आहे. त्यानुसार, महापालिका हद्दीतील अंध, नि:समर्थ, कर्णबधीर, मतिमंद व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत पास देण्याबाबत उपलेखाशिर्षावरून २ कोटी २० लाख टक्के ७१ हजार रुपये ही रक्कम पीएमपीएमएलला देण्यात येणार आहे.
















