- वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद; पोलिसांकडून तरुणाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- अशास्त्रीय पद्धतीने गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू झाला. हा प्रकार १२ मार्च रोजी काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. विकास वसंत मोहिते (रा. कोलेवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
तरुणीच्या वडिलांनी रविवारी (दि. २१) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
गर्भधारणा झाल्यानंतर तरुणीचा अशास्त्रीय पद्धतीने गर्भपात घडवून आणला. मात्र जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
















