न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात.
अशा २८३ जणांवर शनिवारी (दि. २७) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (४४), भोसरी (१५), पिंपरी (००), चिंचवड (५३), निगडी (२०), आळंदी (१७), चाकण (१२), दिघी (२६), म्हाळुंगे चौकी (१५), सांगवी (१९), वाकड (२), हिंजवडी (०४), देहूरोड (०५), तळेगाव दाभाडे (००), तळेगाव एमआयडीसी (२६), चिखली (२०), रावेत चौकी (१०), शिरगाव चौकी (१३)
















