न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २९ मार्च) रोजी १४७२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १३१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – पिपरी (६५ वर्षे), चिखली (३५ वर्षे), वाकड (८१ वर्ष), मोशी (४८ वर्षे), पिंपळे सौदागर (६२ वर्षे), पिंपळे निलख (५९ वर्ष), चिखली (६४ वर्ष), ०४ स्त्री – पिंपरी (६० वर्षे), आकुर्डी (८५, ७१ वर्षे), चऱ्होली (४३ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष खडकी (वय ४४ वर्षे), १ स्त्री – मुंढवा (५३ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३६०१३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११७४९२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९७७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २११, ब – २४८, क – १९६, ड – २१०, इ – १७९, फ – १६०, ग – १५७, ह – १११, एकुण – १४७२.