न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २३) :- प्रभाग क्र २७ रहाटणी-काळेवाडी-तापकिरनगर-श्रीनगर येथे रविवार (दि. २३) रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सी. एम. चषक अंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने या स्पर्धेमधे मुलांनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका सुनिता तापकीर, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, युवा नेते शुभम नखाते, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे व आदी मान्यावर उपस्थित होते.
यावेळी मुलांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाजजागृती करणाऱ्या विषयांवर चित्र रेखाटन केले. अतिशय उत्साही वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली.










